Uncategorized
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मैदानात!
मुंबई : दहिसर- बोरिवली- कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाला भेट देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सर्वांशी संवाद साधला आणि विजयासाठी सज्ज राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अभेद्य युतीचा विजय निश्चित असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी केले,.
यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे तसेच शिवसैनिक व मित्र पक्षाचे कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
