Uncategorized
मुंबई: सध्या राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडताना दिसत आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बहुतांश जागांवर सहमती झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिथे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत, अशा तीन महत्त्वाच्या जागांवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ज्या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत, तिथल्या किमान तीन जागा आम्हाला हव्याच, अशी आग्रही मागणी मनसेने लावून धरली आहे. यामध्ये माहिम, शिवडी आणि विक्रोळी रया तीन विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागांचा समावेश आहे. माहिम हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. या ठिकाणी मनसेला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. मात्र, ठाकरे गटाचा येथे जुना बालेकिल्ला असल्याने ते माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शिवडीतून अजय चौधरी आणि विक्रोळीतून सुनील राऊत हे ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट आपल्या आमदारांच्या मतदारसंघात मनसेला जागा देणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मैदानात!
मुंबई : दहिसर- बोरिवली- कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाला भेट देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सर्वांशी संवाद साधला आणि…
Read More »